अमिताभ बच्चन वेब सीरिजमध्ये झळकणार! | पुढारी

अमिताभ बच्चन वेब सीरिजमध्ये झळकणार!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘सहस्रकातील महानायक’ अमिताभ बच्चन यांचा रविवारी वाढदिवस आहे. उतारवयातही ‘बिग बी’ यांचा काम करण्याचा धडाका तरुणांनाही लाजवणाराच आहे. 

सध्या कोरोनावर मात करून ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सत्रात गुंतले आहेत. आता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहेत. लवकरच ते ‘शांताराम’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. 

या वेब सीरीजमध्ये बिग बी यांच्यासमवेत राधिका आपटे व चार्ली हन्‍नम यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस् यांच्या ‘शांताराम’ या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज आहे. ही कादंबरी सन २००३ मध्ये प्रकाशित झाली होती. 

२००७ मध्ये मीरा नायर यांनी यावर काम सुरू केले. ज्यामध्ये जॉनी डेप दिसणार होता. अमिताभ बच्चन देखील या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होते. परंतु काही कारणांमुळे हा प्रकल्प थांबवावा लागला.

आता एका दशकापेक्षा जास्त काळानंतर, जस्टीन कुर्झलने पुन्हा एकदा या शांताराम ही कादंबरी मोठ्या पडद्यावर आणण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. 

ॲप्पल टीवीच्या या वेब सीरीजमध्ये बिग बी एका गुन्हेगाराची भूमिका साकारणार आहेत. या पात्राचे नाम खदर खान आहे. ऑस्ट्रेलियातून निसटून मुंबईच्या झोपडपट्टीत आपले नवीन जीवन सुरू करणार्‍या माणसाची ही कहाणी आहे.

२०२१ पासून या वेब सीरीजचे चित्रीकरण सुरू होईल. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये याचे चित्रीकरण केले जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे.

Back to top button