औरंगाबाद : स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीवरून संजय निंबाळकर यांच्यावर शाईफेक | पुढारी

औरंगाबाद : स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीवरून संजय निंबाळकर यांच्यावर शाईफेक

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी (दि.२७) रिपब्लिकन सेना आणि उस्मानाबादच्या उपकेंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यात झटापट झाली. यादरम्यान, निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथील उपकेंद्र हे स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून वाद झाला.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी हा विद्यापीठ विभाजनाचा घाट असल्याचा आरोप करीत व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर करत आक्रमक भुमिका पहायला मिळाले. निकम यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर हे आरोप करत शाईफेक केली.

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यासोबत बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. व त्यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्या मध्ये झटापट देखील झाले. या वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केले.

हेही वाचा

Back to top button