ऐकावं ते नवलच : 77 वर्षांची नवरी! 23 चा नवरा!! | पुढारी

ऐकावं ते नवलच : 77 वर्षांची नवरी! 23 चा नवरा!!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
77 वर्षांच्या अल्मेडा यांचा पती 23 वर्षांचा आहे, अमेरिकेत हे उघडकीला आले आणि समाजमाध्यमांतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. टेनेसीचे रहिवासी असलेल्या या जोडप्याने लग्‍न केले तेव्हा अल्मेडा 71 वर्षांच्या, तर गॅरी 17 वर्षांचा होता. अल्मेडा गॅरीहून 54 वर्षांनी मोठ्या आहेत.

सन 2015 मध्ये अल्मेडा यांच्या मुलाच्या अंत्यविधीला गॅरीशी त्यांची भेट झाली होती. नंतर बरोबर 15 दिवसांनी या दोघांनी लग्‍न केले. लग्‍नानंतर गॅरी हा अल्मेडाच्या घरीच राहू लागला. अल्मेडाचा एक नातू आहे, तो गॅरीहून 3 वर्षांनी मोठा आहे. अलीकडेच दोघांच्या लग्‍नाची सहावी अ‍ॅनिव्हर्सरी होती… ती दोघांनी जोमात साजरी केली!

वय काय? तर, एक आकडा

‘ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन’ या आविर्भावात अल्मेडा यांनी नात्यावरील टीका उडवून लावली. दुसरीकडे गॅरी म्हणतो, वय वगैरे काही नसते, तो एक आकडा असतो फक्‍त… आणि आकड्यात काय अडकायचे?

Back to top button