निसर्ग समजून घेण्यासाठी ‘या’ डाॅक्युमेंटरीज पहायलाच हव्या!

निसर्ग संवर्धन दिन : निसर्गाच्या समजून घेण्यासाठी 'या' डाॅक्युमेंटरीज पहायला हव्या!
निसर्ग संवर्धन दिन : निसर्गाच्या समजून घेण्यासाठी 'या' डाॅक्युमेंटरीज पहायला हव्या!

पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामानातील बदल, जंगलांचा ऱ्हास आणि कार्बनचा विळखा हे सध्याचे अतिशय गंभीर आणि सर्वात जास्त चर्चिले जाणारे मुद्दे आहेत. २८ जुलै रोजी निसर्ग संवर्धन दिन आहे. यानिमित्ताने नेटफ्लिक्सवर या डॉक्युमेंटरीजमध्ये निसर्गसंपन्न वसुंधरेविषयी अधिकाधिक रोचक माहिजी जाणून घेता येते. निसर्गातील वेगवेगळ्या कला आणि किमया एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी, निसर्गाची काळजी  घेणे इतके का गरजेचे आहे? त्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या डॉक्युमेंटरीज आहे. यामध्ये समुद्राच्या तळापासून वेगवेगळ्या भूप्रदेशांपर्यंत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील डाॅक्युमेंटरीज अवश्य पहायला हवा.

अवर प्लॅनेट : एमी पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही क्रांतिकारी डॉक्युमेंटरी सीरिज एकूण 8 भागांची आहे.  सर डेव्हिड अटेनबरो यांनी या डॉक्युमेंटरीला आवाज दिलेला आहे. चार वर्षात तब्बल ५० देशांमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या डॉक्युमेंटरीमध्ये जगभरातील विविध अधिवासांच्या विविधतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं आहे.

नाईट ऑन अर्थ : सर्वोत्तम निसर्गाविष्कार आणि थर्मल इमेजिंग, नाईट-व्हिजन गॉगल्स, इन्फ्रारेड लाईट आणि  अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञाने यांचा मिलाप घडवून आणत तयार करण्यात आलेली ही अभिनव सीरिज आहे.  सूर्य मावळल्यानंतर पृथ्वीवर काय-काय घडामोडी होतात याचे अचंबित करणारे दर्शन ही सीरिज घडते.

अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट : सर डेव्हिड अटेनबरो यांनी आपल्या ९३ वर्षांच्या आयुष्यात जेवढी पृथ्वी पाहिली तेवढी क्वचितच कोणी पाहिली असेल. पृथ्वीवर मनुष्य प्राण्याने घडवलेल्या प्रभावाचे प्रामाणिक आणि ठळक चित्र दाखवणारी ही डॉक्युमेंटरी आहे.

चेजिंग कोरल : २०१७ साली प्रकाशित करण्यात आलेली ही डॉक्युमेंटरी शास्त्रज्ञ, पाणडुबे आणि छायाचित्रकारांच्या अशा एका टीमबद्दल आहे, ज्यांनी प्रवाळांवर प्रदूषणामुळे होणाऱ्या प्रभावांचा अभ्यास केला.

महाप्रचंड असे हे प्रवाळदेखील हवामानातील बदलांमुळे नष्ट होण्याची संभावना किती दाट आहे हे ही डॉक्युमेंटरी दर्शवते.

ब्रेकिंग बाउंड्रीज; द सायन्स ऑफ अवर प्लॅनेट : पृथ्वीवरील जैवविविधतेचे संतुलन किती धोक्यात आले आहे हे दर्शवणारी ही डॉक्युमेंटरी आपल्या डोळ्यात चांगलेच अंजन घालते. आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या परीने कोणकोणते छोटे पण उपयुक्त उपाय करू शकतो. याबाबत तज्ञांकडून माहिती मिळवण्यासाठी ही डॉक्युमेंटरी अवश्य पाहावी.

माय ऑक्टोपस टीचर : सर्वोत्तम डॉक्युमेंटरीचा (फीचर) अकॅडेमी पुरस्कार देण्यात आलेली ही डॉक्युमेंटरी एक सिनेदिग्दर्शक आणि एक ऑक्टोपस यांच्या भोवती फिरते. मानव आणि निसर्ग यांच्या दरम्यानच्या मैत्रीचे मनोहारी दर्शन घडवत असतानाच ते एकमेकांकडून काय शिकू शकतात ते देखील यामध्ये ठळकपणे सांगितले गेले आहे. तर, निसर्ग संवर्धन दिन असल्यामुळे तरी या डाॅक्युमेंटरीज पाहून निसर्गाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.

पहा व्हिडीओ : सह्याद्रीतील हिरव्या बेडकाची अनोखी गोष्ट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news