Ukraine vs Russia : आतापर्यंत ३२.५० लाख लोकांनी सोडले युक्रेन

रशियाकडून हल्ला झाल्यानंतर पलायन
रशियाकडून हल्ला झाल्यानंतर पलायन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर आत्तापर्यंत ३२.५० लाख लोकांनी देश सोडला आहे. यामध्ये २० लाख लोकांनी पोलंड बॉर्डर क्रॉस केली आहे. ही माहिती शुक्रवारी संयुक्त राष्ट संघाकडून देण्यात आली आहे. यूएनची एजन्सी यूएनएचसीआर नुसार, २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर आजपर्यंत ३,२७०,६६२ लोकांनी उक्रेनमधून पलायन केले आहे. (Ukraine vs Russia)

युक्रेन सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

यूएनएचसीआर चे प्रवक्ता मैथ्यू साल्टमार्श यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्घाच्या सुरूवात दिवसांच्या तुलनेत पलायन करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. साल्टमार्श म्हणाले आहेत की, ही संख्या २० लाखांपेक्षा जास्त आहे. युद्धाचे दिवस वाढल्याने आणि परिस्थिती बिघडल्यानंतर पलायन करणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते. साल्टमार्श म्हणले की, देश सोडून जाणाऱ्यांमध्ये ९० टक्के संख्या महिला आणि बालकांची आहे. युक्रेनची लोकसंख्या ४ कोटी आहे. (Ukraine vs Russia)

युक्रेनमधून लाखों लोकांनी केले पोलंडला पलायन

युद्ध सुरू झाल्यानंतर लोक युक्रेनमधून पोलंडमध्ये पलायन करत आहेत. यूएनएचसीआरच्या ताज्या आकडेवारीनुसार १,९७५,४४९ लोकांनी पोलंडमध्ये पलायन केले आहे. तर शुक्रवारपर्यंत युक्रेनमधून २० लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी पलायन केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात येत आहे. (Ukraine vs Russia)

किती लोकांनी केले रोमानियाला पलायन?

यूएनएससीआरच्या माहितीनुसार युक्रेनमधून पाच लाखपेक्षा जास्त लोकांनी रोमानियाकडे पलायन केले आहे. आकडेवारीनुसार ही संख्या ५०८,६९२ इतकी आहे. यामध्ये मोल्डोवामधून आलेल्या लोकांचा देखील समावेश आहे. यामध्ये मोठी संख्या अशा लोकांची आहे, जे रोमानियातून यूरोपीय देशात पोहचले आहेत. (Ukraine vs Russia)

मोल्डोवा मध्ये २६ लोकांनी केले पलायन

मोल्डावा हा २६ लाख लोकसंख्या असलेला गरीब देश आहे. यूएनएजआरसीच्या माहितीनुसार युक्रेनमधून ३५५,४२६ लोकांनी रोमानिया आणि युक्रेनच्या मध्ये असलेला देशात पोहचले आहेत. युक्रेनच्या ओडेसा शहरापासून या देशात सागरी सीमा फार दूर आहे.

रशिया आणि बेलारूस

रशियाकडूनही मोठ्या संख्येने युक्रेनमधील शरणार्थींना देशात घेतले जात आहे. रशियातील शरणार्थींची संख्या १,८४,५६३ इतका आहे. यूएनएचसीआरने दिलेल्या माहितीनुसार ५० हजार लोक २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान रशियात पोहचले आहेत, तर बेलारूसमध्ये पोहचलेल्या शरणार्थींची लोकसंख्या २,१२७ इतकी आहे. (Ukraine vs Russia)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news