कोल्हापूर : ‘द काश्मीर फाईल्स आणि पावनखिंड चित्रपट करमुक्त करा’ | पुढारी

कोल्हापूर : ‘द काश्मीर फाईल्स आणि पावनखिंड चित्रपट करमुक्त करा'

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट करमुक्त करावे अशी मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वीकारले.

हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काश्मीर येथे वर्ष १९९० मध्ये नेमके काय झाले, ते या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. हा चित्रपट हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक येथे करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटात सत्य चित्रीकरण दाखवण्यात आले असल्याने हा चित्रपट करमुक्त होणे अत्यावश्यक आहे.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शिवसेनेचे किशोर घाटगे, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, पंचायत समिती सदस्य कृष्णात पवार, विश्‍व हिंदू परिषदेचे विजयराव पाटील, विश्‍व हिंदू परिषद जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदुरकर-जोशी, सनातनचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे आणि शिवानंद स्वामी, संभाजीराव (बंडा) साळुंखे, महेश उरसाल, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button