देशात बनली पहिली ‘टच फ्री’ टच स्क्रीन! काय आहे हे तंत्रज्ञान

देशात बनली पहिली ‘टच फ्री’ टच स्क्रीन! काय आहे हे तंत्रज्ञान
Published on
Updated on

बंगळूर :  जगभरात कोरोना महामारीने काही नव्या संशोधनांनाही चालना दिलेली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सध्या स्पर्शरहीत वापर करण्याच्या साधनांचीही निर्मिती केली जात आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा एटीएम मशिनच्या टच स्क्रीनवर मात्र आपल्याला स्पर्श करावा लागत असतो. त्यामधून संक्रमणाचा धोकाही वाढू शकतो. या समस्येवर उपाय म्हणून बंगळूरच्या वैज्ञानिकांनी एक 'टच फ्री' टच स्क्रीन विकसित केली आहे. तिच्या मदतीने आपण 9 सेंटीमीटरच्या अंतराने कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा सहज वापर करून शकतो! याचा अर्थ टच स्क्रीनचा वापरही आपण काही अंतर ठेवून करू शकतो.

अर्थातच यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. तो 'टचलेस टच सेन्सर' म्हणून ओळखला जातो. सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड अँड सायंटिफिक रिसर्चच्या वैज्ञानिकांनी तो संयुक्तरीत्या विकसित केला आहे. या 'टचलेस टच सेन्सर'ची एका खास प्रिंटिंग तंत्रज्ञानाने निर्मिती केली जाते. त्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रॉडक्शन प्लँट लावलेला आहे. इथे 300 मायक्रोनच्या रिझोल्युशनच्या प्रिंटेड अ‍ॅडेड पॅटर्नचे प्रॉडक्शन केले जाईल.

हे एक प्रकारचे पारदर्शक इलेक्ट्रोडस् आहेत ज्यांना टचलेस स्क्रीनच्या तंत्रामध्ये वापर करता येऊ शकते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे सेन्सर अतिशय किफायतशीर आहे. सेल्फ-सर्व्हिस कियोस्क, एटीएम आणि वेंडिंग मशिनसारख्या सार्वजनिक उपकरणांसाठीही ते उपयुक्त ठरू शकते. या संशोधनाची माहिती 'मटेरियल्स लेटर्स' जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आली आहे. वैज्ञानिक आशुतोष के. सिंह यांनी म्हटले आहे की त्यांच्या टीमने असा टच सेन्सर बनवला आहे जो उपकरणापासून 9 सेंटीमीटरच्या अंतरावरूनही जवळच्या किंवा आसपासच्या वस्तूंना स्पर्शाची जाणीव करून देऊ शकतो. प्रत्यक्ष स्पर्श केल्याशिवायच संबंधित उपकरणांच्या स्क्रीन आपल्या निर्देशांनुसार काम करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news