अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोरोना पाॅझिटिव्ह, लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा | पुढारी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोरोना पाॅझिटिव्ह, लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ”माझी नुकतीच COVID चाचणी पॉझिटिव्ह आलीय. काही दिवसांपासून माझा घसा खवखवत होता. पण काळजी करण्याचे कारण नसून मी बरा आहे. मिशेल आणि मी लस घेतली आहे. मिशेल यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.” असे ओबामा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना रुग्ण कमी होत आहेत. पण तरीही तुम्ही याआधी लस घेतली नसेल तर आता लस घ्या, असे आवाहन ओबामा यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, ओबामा यांचे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. बराक ओबामा तुम्ही कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या सदिच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात ब्रिटन, नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इटली या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेत दररोज सरासरी ३४ हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button