Zelenskyy : झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला पळाले, रशियन मीडियाचा दावा | पुढारी

Zelenskyy : झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला पळाले, रशियन मीडियाचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियन सैन्य युक्रेनच्या भूमीवर क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक करून कहर करत आहेत. राजधानी कीवमध्ये रशियन सैन्याची कारवाई सुरूच आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी युक्रेन सोडून पोलंडमध्ये पलायन केल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे.

रशियन मीडियाच्या दाव्यानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी देश सोडला आहे आणि पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र, रशियाच्या दाव्यावर युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच रशियन मीडियाने दावा केला होता की, झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडले आहे. त्यानंतर स्वत: झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून रशियाचा हा दावा फेटाळून लावला होता. मी शेवटपर्यंत देश सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

12 लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला…

युक्रेन आणि रशियन सैन्यामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधून 12 लाख लोकांनी पलायन केले आहे. या लोकांनी युक्रेन सोडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. यातील 50 हजार लोक तरुण आहेत. अहवालानुसार, युक्रेनियन नागरिकांची देश सोडण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

UNSC तातडीची बैठक घेणार…

रशियन सैन्याच्या अणु प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या गंभीर विषयावर आज UNSC ने तातडीची बैठक बोलावल्याचे कळते.

 

Back to top button