Camille Alexander : अरे बाप रे! अंगावरील केस विकून ही मॉडेल कमावत आहे कोट्यवधी रुपये | पुढारी

Camille Alexander : अरे बाप रे! अंगावरील केस विकून ही मॉडेल कमावत आहे कोट्यवधी रुपये

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या शरीरावरील वाढलेले केस कुणालाच आवडत नाहीत. महिलांसह आता पुरुषही अंगावरील केस काढण्यासठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग करतात. अंगावरील केस दिसायलाही अत्यंत घाणेरडं आणि किळसवाणं वाटतं. पण, आम्ही तुम्हाला असं सांगितलं की, एक तरूणी चक्क अंगावरील केस वाढवून ते विकते आणि त्यातून रग्गड पैसा कमवते. पटत नाही ना? पण हे खरंय… चला पाहुयात कोण आहे ही महिला…

तर या तरुणीचं नाव आहे कॅमिली अलेक्झांडर. तिचं वय अवघं २५ वर्षं आहे. ती व्यवसायाने संगीतकार आणि माॅडेल आहे. तिने आपल्या आपल्या अंगावरील नैसर्गिकपणे येणाऱ्या केसांचा स्वीकार केला आणि त्यांना वाढू दिलं. मागील ४ वर्षांपासून कॅमिलीने आपल्या शरीरावरील केस काढलेच नाहीत.

अंगावरील केसांसंदर्भात पारंपरिक विचार कॅमिलीने मोडीत काढला आहे. मूळात महिलांनी अंगावरील केस काढल्यानंतर त्या सुंदर दिसतात आणि पुरुषांनी अंगावरील केस काढू नयेत. कारण, त्यांचा पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह राहू शकतं. पण, हे सगळे समाजातील पारंपरिक नियम तोडून कॅमिलीने आपल्या शरीरावरील केस काढलेले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Camille Alexander (@pansyisinsane)

डेली स्टारच्या वृत्तानुसार कॅमिलीने असं सांगितलं की, “पुरुषांना महिलांना शरीरावरील केसांसहीत पाहायचं असतं. त्यामुळे ही क्युरॅसिटी असणारे पुरूष त्यासाठी पैसेदेखील मोजण्यास ते तयार असतात. त्यामुळे अंगावर केस ठेवणाऱ्या महिलांना पैसे कमविण्याची चांगली संधी आहे. एका ग्राहकाने महिलेचे केस असणाऱ्या ब्रशची मागणी केलेली होती. महिलेचे केस असणारा ब्रश त्याला खरेदी करायचा होता. इतकंच नाही तर, अंडरवेअरदेखील एका ग्राहकाने ३० हजार रुपयांत खरेदी केलं होतं.”

हे वाचलंत का? 

Back to top button