रुजू होण्यापूर्वीच ‘टाटा’! एअर इंडियाच्या CEO पदास इल्कर आयसींचा नकार; ‘रॉ’मुळे घेतला निर्णय?

रुजू होण्यापूर्वीच ‘टाटा’! एअर इंडियाच्या CEO पदास इल्कर आयसींचा नकार; ‘रॉ’मुळे घेतला निर्णय?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : तुर्कीचे इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होण्याची ऑफर नाकारली आहे. विमान उद्योगातील सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा सन्सने १४ फेब्रुवारी रोजी तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर आयसी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या संलग्न स्वदेशी जागरण मंच (एसजेएम) ने शुक्रवारी म्हटले होते की सरकारने एअर इंडियामध्ये इलकर आयसी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून परवानगी दिली जाऊ नये. स्वदेशी जागरण मंचच्या सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी सरकार या विषयाबाबत संवेदनशील असून हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे सांगितले होते.

इल्कर आयसी यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार होती. एका अहवालानुसार, प्रस्थापित परंपरेनुसार, भारतातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केलेल्या सर्व परदेशी नागरिकांची पार्श्वभूमी तपासली जाते आणि इल्कर आयसी यांच्या बाबतीतही तेच करायचे होते. दरम्यान, आणखी एका अहवालात असेही म्हटले आहे की, इल्कर आयसी पाकिस्तानचे मित्र मानले जाणारे तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांचे सल्लागार म्हणूनही काम केले होते. या बाबीही त्यांच्या नकाराचे कारण असू शकतात.

इल्कर आयसींचा जन्म इस्तंबूलमध्ये

विशेष म्हणजे ५१ वर्षीय के इल्कर यांचा जन्म १९७१ मध्ये इस्तंबूलमध्ये झाला. २०१५ मध्ये त्यांची तुर्की एअरलाइन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सात वर्षे सेवा केल्यानंतर, त्यांनी २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बैठकीत बराच विचारविनिमय केल्यानंतर आता त्यांना एअर इंडियाची कमान देण्यात आली. त्यांनी १९९४ मध्ये बिलकेंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागातून शिक्षण पूर्ण केले आहे.

उच्च पदे भूषवली

१९९५ मध्ये त्यांनी इंग्लंडच्या लीड्स विद्यापीठात राज्यशास्त्रावर संशोधन प्रकल्प केला आणि १९९७ मध्ये मरमारा विद्यापीठ, इस्तंबूलमधून आंतरराष्ट्रीय संबंध मास्टर्स प्रोग्राम पूर्ण केला. एका रिपोर्टनुसार, ते तुर्की फुटबॉल फेडरेशन, तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट क्लब आणि TFF स्पोर्टिफ अनामित सरकेतीचे बोर्ड सदस्य आहेत. ते कॅनेडियन तुर्की व्यवसाय परिषद आणि यूएस-तुर्की व्यवसाय परिषदेचे सदस्य देखील आहेत. जानेवारी २०११ मध्ये त्यांची तुर्की रिपब्लिक इन्व्हेस्टमेंट सपोर्ट अँड प्रमोशन एजन्सीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news