धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रीचा निर्घृण खून, पोत्यात सापडले मृतदेहाचे दोन तुकडे | पुढारी

धक्कादायक! 'या' अभिनेत्रीचा निर्घृण खून, पोत्यात सापडले मृतदेहाचे दोन तुकडे

ढाका; पुढारी ऑनलाईन

बांगलादेशी प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (Bangladeshi actress Raima Islam Shimu) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. दरम्यान, त्यांचा मृतदेह ढाका येथील केरणीगंज परिसरातील एका पुलाजवळ सापडला. धक्कादायक म्हणजे त्यांचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोत्यात अभिनेत्रीच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले आहेत. तिचा खून दुसरा कोणी नसून तिच्या नवऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने बांगलादेशी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काही स्थानिकांनी अलीपूर पुलाजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या असून अभिनेत्रीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रायमांचा पती शाखावत अली नोबल आणि त्याच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रायमांच्या पतीने कलाबागन पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण पत्नी बेपत्ता असल्याचा बनाव करणारा पतीच खुनी निघाला आहे. त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे. पण त्याने खून नेमका कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रायमांच्या पतीला तीन दिवसांचा रिमांड सुनावण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, बांगलादेश मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या खून प्रकरणात काही अभिनेत्यांचा सहभाग आहे. पण पोलिसांनी अद्याप यासंबंधी काहीही खुलासा केलेला नाही.

रायमा ह्या बांगलादेशी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी १९९८ मध्ये ‘बार्तमन’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तेव्हापासून त्यांनी तब्बल २५ चित्रपट आणि काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

रायमा (Bangladeshi actress Raima Islam Shimu) बांगलादेशची राजधानी ढाका येथील ग्रीन रोड भागात त्यांचा पती आणि दोन मुलांसमवेत रहात होत्या. शिमू गेल्या रविवारी सकाळी शुटिंगसाठी घरातून बाहेर पडली होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यांच्या मुलांना वाटले की त्यांची आई शुटिंगमध्ये व्यस्त असेल. पण रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह पोत्यात आढळून आला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अध्यात्मिक महत्त्व असलेल्या सांगलीतले रामलिंग क्षेत्र | Ramling Sangli

Back to top button