महत्त्वाची अपडेट! आता Instagram bio मध्‍ये पाच लिंक्स देता येणार 

Instagram down
Instagram down
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टाग्राम हा सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी. इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता युजर्सना आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये एका पेक्षा अधिक लिंक्स देता येणार आहेत. एका पेक्षा अधिक म्हणजे एकुण पाच लिंक्स देता येणार आहेत. ही नवीन अपडेट इन्स्टाग्राम युजर्ससाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची आहे. ही माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Instagram bio link )

आपल्यापैकी बरेचजण इन्स्टाग्राम (Instagram bio link) हा सोशल प्लॅटफॉर्मवर आहेत. फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचं एक सोशल मीडिया साईट म्हणून याकडे पाहिलं जात. बरेचजण या इन्स्टाग्रामचा वापर करुन व्यक्त होत असतो. इन्स्टाग्रामही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणत इन्स्टाग्राम वापरण्यात सुलभता आणि हटकेपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी (दि.१८), मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेत म्हटलं आहे की, इन्स्टाग्राम बायोमध्ये आता पाच लिंक्स समाविष्ट होऊ शकतात. याआधी बायोमध्ये केवळ दोन लिंक्स देता येत होत्या. आता पाच लिंक्स देता येणार आहेत.

Instagram bio link : बायोमध्ये लिंक कशी द्याल

तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राममध्ये बायोमध्ये लिंक द्यायची आहे का? तर पुढील गोष्टी करा,

  • प्रथम तुमच्या  इन्स्टाग्राम अकाउंटवर जा,
  • त्यानंतर  एडिट प्रोफाईलला जा,
  • एडिट प्रोफाईल ओपन झाल्यानंतर नाव, युजरनेम,बायो, लिंक्स, पेज आदी पर्याय येतील. त्यामधील लिंक या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर  अॅड लिंकचा पर्याय येईल त्यामध्ये युआरएल आणि टायटल असे दोन पर्याय येतील.
  • युआरएलच्या ठिकाणी युआरएल लिंक आणि टायटल मध्ये तुम्हाला जे टायटल द्यायच आहे ते द्या. उदा. तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलची लिंक देणार असाल तर फेसबुक प्रोफाईलची लिंक आणि फेसबुक हे टायटल देवू शकता.
  • त्यानंतर कोपऱ्यातील अॅरोवर क्लिक करुन अपडेट करा.
  • पुन्हा बॅक अॅरोने प्रोफाईलवर येवून कोपऱ्यातील अॅरोवर क्लिक करुन अकाउंट अपडेट करा.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news