भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! GDP दर ६.३ टक्के राहणार, ‘फिच’चा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! GDP दर ६.३ टक्के राहणार, ‘फिच’चा अंदाज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाचा आर्थिक विकासदर (GDP) ६.३ टक्के राहील, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था 'फिच'ने (Fitch Ratings) व्यक्त केला आहे. याआधी 'फिच'ने देशाचा विकासदर ६ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. पहिल्या तिमाहीतील मजबूत उत्पादनामुळे देशाचा जीडीपी वाढणार असल्याचे संकेत फिचने दिले आहेत. मागील आर्थिक वर्षात (FY22) अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.१ टक्के होता. (India's GDP forecast)

"भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे जानेवारी ते मार्च दरम्यानच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी (GDP) वाढ ६.१ टक्के एवढी आहे. अलीकडील काही महिन्यांत ऑटो विक्री, पीएमआय सर्वेक्षण आणि क्रेडिट वाढ मजबूत राहिली आहे. यामुळे मार्च २०२४ (आर्थिक वर्ष २०२३-२४) मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी विकासदर ०.३ टक्के वाढून ६.३ टक्के राहील," असे फिच रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.

फिचने वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक मागणीत झालेली घट याचा संदर्भ देत मार्चमध्ये २०२३-२४ साठीचा विकास दर अंदाज ६.२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता. २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी प्रत्येकी ६.५ टक्के विकास दर वाढीचा अंदाज आहे.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेने गती घेतल्याने महागाईत घट झाली आहे. जानेवारी-मार्चमध्ये जीडीपीची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे सांगून फिचने म्हटले होते की, सलग दोन तिमाहीत जीडीपीत घट झाली होती. पण बांधकाम व्यवसायाला मिळालेली चालना आणि शेती उत्पादनात वाढ झाल्यानंतर एकूणच उत्पादनात सुधारणा झाली आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news