

कोलंबो ; वृत्तसंस्था : भारताचे युवा खेळाडू पुन्हा एकदा चांगली कामगिरी करीत श्रीलंकेविरुद्ध (India Vs Sri Lanka) मंगळवारी दुसर्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतील.
भारताकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवनने एक बाजू सांभाळली. तर, दुसर्या बाजूने पृथ्वी शॉ, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी फ्री स्टाईल धावा करीत संघाला सात विकेटस्ने विजय मिळवून दिला.
भारतीय संघ टी-20 विश्वचषक लक्षात घेता छोट्या प्रारूपात आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.
पृथ्वी, इशान आणि सूर्यकुमार यांनी याबाबतीत पहिल्या लढतीत चमक दाखवली. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताच्या मजबूत फलंदाजी फळीचा अंदाज येतो.
अधिक वाचा :
इशान आणि सूर्यकुमार यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. श्रीलंकन संघाची गोलंदाजी ही चांगली दिसली नाही. त्यामुळे भारताने 37 व्या षटकांतच विजय मिळवला. (India Vs Sri Lanka)
भारत या सामन्यात अंतिम एकादशमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे. कारण, मालिका जिंकल्यानंतर तिसर्या एकदिवसीय सामन्यात अन्य युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार ते करू शकतात. केवळ मनीष पांडे याची जागा धोक्यात दिसत आहे ज्याला 40 चेंडूंत 26 धावांच करता आल्या.
शॉने पहिल्या लढतीत काही आक्रमक फटके मारले; पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसर्या लढतीत तो ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल. बर्याच काळानंतर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव एकत्र गोलंदाजी करताना दिसले.
स्पिनर्सने अनेक षटके टाकली; पण अष्टपैलू हार्दिक पंड्याने पाच षटके टाकली. अनुभवी जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला फारसा प्रभाव पाडता आला नाही.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला हा सामना जिंकायचा असल्यास त्यांच्या खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. अनुभवाची कमतरता असलेल्या या संघाने आपली क्षमता सिद्ध केली; पण त्यांना विजय मिळवणे सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाचे आहे.
(India Vs Sri Lanka) पहिल्या लढतीत अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांना भारताला आव्हान द्यायचे झाल्यास मोठी खेळी करणे गरजेचे आहे. गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करायचा झाल्यास आणखीन मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.