INDvsBAN Test : पुजारा-अय्यरची अर्धशतके, भारताच्या पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 278 धावा

INDvsBAN Test : पुजारा-अय्यरची अर्धशतके, भारताच्या पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 278 धावा
Published on
Updated on

चट्टोग्राम; पुढारी ऑनलाईन : बांगलादेशी गोलंदाजांच्या अचूक मा-याचा सामना करत टीम इंडियाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर 90 षटकांत 6 गडी गमावून 278 धावा केल्या. श्रेयस अय्यर 82 धावांवर खेळत असून दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला. दरम्यान, रविचंद्रन अश्विन सामन्याच्या दुस-या दिवशी श्रेयसबरोबर मैदानात उतरेल आणि भारतीय संघ 350 धावांच्या जवळपास धावा करण्याचा प्रयत्न करेल.

तत्पूर्वी चट्टोग्राममध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलसह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र, गिल 20 धावा करून बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 41 होती. गिल पॅव्हेलियनमध्ये परतताच कर्णधार राहुल आणि विराट कोहलीही बाद झाले. राहुलने 54 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या. तर विराट अवघ्या एका धावेचे योगदान देऊन माघारी परतला. 48 धावांवर तीन विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला. यानंतर पंत आणि पुजाराने भारतीय डाव सांभाळला. पंत 45 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 46 धावा करून बाद झाला.

यानंतर चेतेश्वर पुजाराने श्रेयस अय्यरच्या साथीने डाव पुढे नेला. श्रेयससह पुजाराने डाव पुढे नेला. दोघांनीही शानदार फलंदाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. अय्यर-पुजारा जोडीने यांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. दोघांनी चांगल्या चेंडूंचा बचाव आणि खराब वाईट चेंडूंवर जोरदार मारा केला. मात्र, दिवसअखेर पुजारा शतक गाठण्यापूर्वीच बाद झाला. त्याचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले. 203 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 90 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली केली. यानंतर अक्षरने श्रेयससोबत 19 धावा जोडल्या, पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर तोही बाद झाला. दुस-या टोकाला श्रेयस अय्यर क्रीजवर 82 धावा करून मैदानावर पाय रोऊन उभा आहे. तर भारताच्या खात्यात रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्याच विकेट शिल्लक असल्याने सामन्याच्या दुस-या दिवशी भारतीय संघ किती धावांपर्यंत मजल मारू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बांगलादेशकडून तैजुल इस्लामने पहिल्या दिवशी तीन बळी घेतले. त्याचवेळी मेहदी हसन मिराजने दोन गडी बाद केले. खालेद अहमदला एक ब्रेकथ्रू मिळाला.

भारताचा कसोटी संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.

बांगला देशचा कसोटी संघ : (पहिल्या सामन्यासाठी) – महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल, जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक. (IND vs BAN 1st Test)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news