IND vs BAN 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्मा बाहेर

IND vs BAN 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्मा बाहेर
Published on
Updated on

ढाका; पुढारी ऑनलाईन : बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघात काही बदल केले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. आता तो बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. (IND vs BAN 1st Test)

अभिमन्यू ईश्वरनचा पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश (IND vs BAN 1st Test)

पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी भारत-अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ईश्वरन सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेश-अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात तो भारत-अ चे नेतृत्व करत होता. बांगलादेश-अ विरुद्धच्या मालिकेत ईश्वरनने बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली. बांगलादेश 'अ' संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ईश्वरनने 141 धावा केल्या. त्याचवेळी दुसऱ्या कसोटीत त्याने 157 धावा केल्या आहेत.

शमी-जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर

यासोबतच बीसीसीआयने आणखी एक मोठी अपडेट दिली आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार शमी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या जागी नवदीप सैनी आणि जडेजाच्या जागी डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जयदेव उनाडकटचाही संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs BAN 1st Test)

सौरभ आणि उनाडकट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत

बांगलादेश-अ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत सौरभ कुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सौरभने 15 विकेट घेतल्या. 74 धावांत सहा बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली होती. सौरभ याआधीही संघात सामील झाला होता, परंतु त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्याचवेळी विजय हजारे ट्रॉफीमध्ये जयदेव उनाडकट उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. नवदीप सैनी बराच काळ कसोटी संघाबाहेर आहे. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

राहुल आणि गिल सलामीला दिसू शकतात

दुसऱ्या वनडेत रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. रोहितने मुंबईत दुखापती संदर्भात तज्ज्ञांची भेट घेतली. दुखापतीमुळे त्याला विश्रांती आणि निरीक्षणाचा सल्ला देण्यात आला आहे. रोहितला बदली म्हणून संघात आलेल्या ईश्वरनला बेंचवर बसावे लागू शकते. केएल राहुल आणि शुबमन गिल पहिल्या कसोटीत ओपनिंग करताना दिसण्याची शक्यता अधिक आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका

तारीख                            सामन्याचे ठिकाण

14-18 डिसेंबर                     पहिली कसोटी चितगाव
22-26 डिसेंबर                     दुसरी कसोटी ढाका

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news