

इंदापूर(पुणे) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे माती विहिरीत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली होती. या घटनेत चारही मजुरांचा दुर्दैवी मृत्य झाला आहे. या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत मजुरांच्या कुटुंबाना पाच लाखाची मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कामगारांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली होती.
म्हसोबावाडी येथे शेतातील विहीरीच्या रिंग बांधकाम करताना रिंग पडुन व मुरूम ढासळल्याने या दुर्घटनेत इंदापुर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार मजुर गाडले होते. सोमवारी (दि. १) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसोबाची वाडी येथे ही घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे कर्मचारी वर्ग तसेच तहसीलदार तळ ठोकून होते. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतून चारही मजुरांना बाहेर काढण्यात एनडीएफआरच्या पथकाला यश आलं.
हेही वाचा