Jaiswal-Gill Pair Record: जैस्वाल-गिल जोडीने मोडला रोहित-धवनचा ‘हा’ मोठा विक्रम!

Jaiswal-Gill Pair Record: जैस्वाल-गिल जोडीने मोडला रोहित-धवनचा ‘हा’ मोठा विक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. चौथ्या टी-20 सामन्यातील विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारतीय संघाने सहज गाठले. या सामन्यात गिल आणि जैस्वाल या सलामी जोडीने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मोठा विक्रम रचला. (jaiswal-gill pair record India vs West Indies 4th T20)

गिल-जैस्वाल यांचा चमत्कार (India vs West Indies 4th T20)

यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळून चौफेर फटकेबाजी केली. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. गिलने 77 आणि जैस्वालने 84 धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. जैस्वाल-गिलने रोहित शर्मा आणि शिखर धवनचे रेकॉर्डही मोडले आहेत. रोहित-धवनमध्ये T20 मध्ये 160 धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली.

टी-20 मध्ये भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी :

दीपक हुडा-संजू सॅमसन : 176 धावा
केएल राहुल-रोहित शर्मा : 165 धावा
शुभमन गिल-यशस्वी जैस्वाल : 165 धावा
शिखर धवन-रोहित शर्मा : 160 धावा

भारतीय संघाने सामना जिंकला

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. गोलंदाजांनी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आणि विंडिजच्या फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करू दिली नाही. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्यानेच विंडीजच्या सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कुलदीप यादवच्या खात्यात 2 बळी पडले. याशिवाय युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी 1-1 विकेट घेतली. (jaiswal-gill pair record India vs West Indies 4th T20)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news