IND vs SA : टीम इंडियासमोर दुखापतीचे संकट, चार खेळाडू जखमी

IND vs SA : टीम इंडियासमोर दुखापतीचे संकट, चार खेळाडू जखमी
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या आगामी कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दोन्ही संघादरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

मात्र, टीम इंडियासमोर दुखापतीचे संकट उभे ठाकले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शुभमन गिल आणि इशांत शर्मा हे खेळाडू जखमी आहेत. या खेळाडूंना दुखापतीमधून सावरण्यासाठी काही आठवडे लागणार असल्याने त्यांना या दौर्‍यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा हे दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत झालेल्या दुसर्‍या कसोटीत खेळू शकले नव्हते. जडेजाला 'लिगामेंट टियर' तर इशांतच्या बोटाला दुखापत झाली आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी महिने लागतील. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तर जडेजा 'आयपीएल-2022'च्या आसपास बरा होईल.

जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली.

IND vs SA : अक्षरही स्ट्रेस फ्रॅक्‍चरने त्रस्त

मात्र, अक्षरही स्ट्रेस फ्रॅक्‍चरने त्रस्त बनला आहे. यातून सावरण्यासाठी त्याला किमान सहा आठवडे लागणार आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाकडे डावखुर्‍या स्पिनरच्या रूपात दुसरा पर्यायच नाही.

यामुळे आर. अश्‍विनवरच भारत अवलंबून असणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजीस साथ देणार्‍या खेळपट्ट्यांवर संघात एकच फिरकी गोलंदाज पुरेसा आहे.

दरम्यान, निवड समिती अक्षर व जडेजाच्या स्थानी शाहबाज नदीम आणि सौरभ कुमारला संधी देऊ शकते. हे दोन्ही खेळाडू सध्या भारत 'अ' संघातून दक्षिण आफ्रिकेत खेळत आहेत.

शुभमन गिलही जखमी

सलामी फलंदाज शुभमनही दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली आहे. याशिवाय त्याच्या डाव्या हातालाही क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यामुळे तो क्षेत्ररक्षणास तसेच दुसर्‍या डावात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.

द. आफ्रिकेचा संघ पुढील प्रमाणे….

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कागिसो रबाडा, सारेल आर्वी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, व्यान मुल्डर, एनरिक नॉर्खिया, कीगन पीटरसन , रासी वॅन डर डुसेन, काइल विरेन, मार्को जेन्सेन, ग्लेंटन स्टरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिचेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news