

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK WC 2023 : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात भारताविरुद्ध आक्रमकता का दिसत नाही? असा सवाल पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफला करण्यात आला. यावेळी असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला हॅरिस रौफने झोडपून काढले. हॅरिस रौफने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यात क्रिकेट खेळण्यासाठी जात आहे, युद्ध करण्यासाठी नाही.
पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान आपल्या संघात आक्रमकतेची कमतरता भासत आहे का? असा सवाल करणाऱ्या रौफने खडसावले. हॅरिस रौफने भारताला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. (IND vs PAK WC 2023)
रौफ म्हणाला की, पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यासाठी गेला होता, कोणतेही युद्ध नाही. आगामी विश्वचषकात सहभागी होण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचेही रौफने सांगितले.
मी भारतीयांशी का लढू? हे क्रिकेट आहे, युद्ध नाही. कोणत्याही मोठ्या स्पर्धेत देशासाठी खेळणे खूप मोठी गोष्ट असते. माझा फिटनेस पूर्वीपेक्षा चांगला आहे. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. मला नवीन चेंडू मिळणार की जुना याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. विश्वचषकासाठी माझे कोणतेही विशिष्ट ध्येय नाही. अधिक लक्ष सांघिक कामगिरीवर आहे, असे रौफ याने सांगितले.
आगमी विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. नसीम शाहच्या जागी हसन अलीचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs PAK WC 2023)
हेही वाचा :