IND vs ENG : भारतापाठोपाठ इंग्लंडलाही धक्का; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs ENG : भारतापाठोपाठ इंग्लंडलाही धक्का; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लीच या मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. आता तो राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या कसाेटी सामन्यांना मुकणार आहे. (IND vs ENG)

जॅक लीच अबुधाबीहून मायदेशात परतणार

दुखापतीमुळे डावखुरा फिरकीपटू लीच विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. पुढच्या सामन्यापूर्वी नऊ दिवसांची विश्रांती घेण्यासाठी लीच दुसऱ्या कसोटीनंतर उर्वरित संघासह अबू धाबीला रवाना झाला. रविवारी, ईसीबीने सांगितले की तो अबू धाबीहून घरी परतेल आणि फिटनेसवर काम करेल. (IND vs ENG)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news