IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग 11 ची घोषणा, संघात 2 महत्त्वाचे बदल

IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग 11 ची घोषणा, संघात 2 महत्त्वाचे बदल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG Ranchi Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून (शुक्रवार) रांची येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग-11 ची गुरुवारी घोषणा केली. इंग्लिश संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या जागी मिस्ट्री स्पिनर शोएब बशीरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर मार्क वुडच्या जागी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला स्थान मिळाले आहे. दोन स्पेशलिस्ट फिरकीपटू (टॉम हार्टले आणि शोएब बशीर) आणि दोन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज (जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन) यांच्यासह इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात खेळताआ दिसेल. (IND vs ENG Ranchi Test)

IND vs ENG Ranchi Test : इंग्लंडची प्लेइंग-11

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

कोण आहे ओली रॉबिन्सन?

30 वर्षीय ओली रॉबिन्सन हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यांमध्ये 76 बळी घेतले आहेत. तो प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी त्याने भारताविरुद्ध इंग्लिश मैदानावर चार सामने खेळले आहेत. ज्यात रॉबिन्सनने 21 बळी घेतले होते. दुसरीकडे शोएब बशीर हा पाकिस्तानी वंशाचा ऑफस्पिनर आहे. 20 वर्षीय बशीरने सध्याच्या मालिकेदरम्यान विझाग (विशाखापट्टणम) येथे कसोटी पदार्पण केले, जिथे त्याने चार विकेट घेतल्या. बशीरचा जन्म इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये झाला होता. मात्र त्याचे आई-वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत.

अँडरसन घडवू शकतो इतिहास

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आतापर्यंत 185 कसोटी सामन्यात 696 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत तो 700 बळी घेण्याच्या अगदी जवळ आहे. त्याचा हा सातवा भारत दौरा आहे. त्याने भारताविरुद्धच्या 37 कसोटी सामन्यांमध्ये 25.35 च्या सरासरीने 145 बळी घेतले आहेत. या काळात अँडरसनने सहा वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची किमया केली आहे. 2012 च्या मालिकेत अँडरसनने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे इंग्लंडने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा 2-1 ने पराभव केला होता. अँडरसनने त्या मालिकेत 12 विकेट घेतल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news