IND vs AUS Test : मिचेल स्टार्क, कॅमेरून ग्रीन भारताविरूध्दच्या मालिकेला मुकणार

IND vs AUS Test : मिचेल स्टार्क, कॅमेरून ग्रीन भारताविरूध्दच्या मालिकेला मुकणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन हे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले असून ते द. आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या आणि तिस-या कसोटीतून बाहेर पडले आहेत. तसेच अगामी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला ते मुकणार असल्याचे समजते आहे.

ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनपाठोपाठ मेलबर्नमधील सामना जिंकून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 4 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का बसला आहे. अष्टपैलू ग्रीन आणि धोकादायक वेगवान गोलंदाज स्टार्क सिडनी कसोटीत दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रीनच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी, भारताविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल असे सांगण्यात आले आहे. कांगारू संघ भारत दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेनंतर ग्रीन आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. (IND vs AUS Test)

नागपूर कसोटीला मुकणार स्टार्क

स्टार्कबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे समजते आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत क्षेत्ररक्षण करताना स्टार्कला दुखापत झाली होती. तो दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहू शकतो. त्यामुळे स्टार्क भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणे कठीण झाले आहे. हा सामना नागपुरात 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारीला दिल्लीत, तिसरा सामना 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा आणि चौथा सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

cricket.com.au ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ग्रीनने दुखापतीबाबत एका तज्ज्ञाचा सल्ला घेतला आहे. त्यांनी शस्त्रक्रियेची शिफारस केली आहे. ग्रीनच्या बोटाला एनरिच नॉर्टजेने फेकलेला बाउन्सर चेंडू आपटला होता. त्याला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानातूनबाहेर जावे लागले होते. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या वेदनांना सहन करत त्याने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी जिंकल्यानंतर स्टार्क म्हणाला, 'भारताचा पुढील दौरा खूप मोठा आहे. मी ज्या हाताने गोलंदाजी करतो त्यालाच दुखापत झाली आहे. त्यामुळे मला अधिक काळजी घ्यावी लागेल. माझ्या आधी ग्रीन संघात पुनरागमन करेल असे मला वाटते.'

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news