IND vs AUS : वर्ल्ड कपनंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार टी-20 मालिका
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टीम इंडियाचे वर्ल्ड कप पर्यंतचे वेळापत्रक पूर्णपणे टाईट आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतरही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू शकते. (IND vs AUS)
भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत खूप व्यस्त आहे. पुढील 4-5 महिन्यांचे वेळापत्रक पूर्णपणे भरलेले आहे. डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभव विसरून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्यावर दोन कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. (IND vs AUS)
यानंतर संघाला आयर्लंडला जायचे आहे, मग आशिया कप खेळायचा आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका पण खेळणार आहे. त्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे वर्ल्ड कपपर्यंतचे वेळापत्रक हे पूर्णपणे टाईट आहे. दरम्यान वर्ल्ड कप संपल्यानंतरही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू शकते.
हेही वाचा;
- Wimbledon : 'अजूनही स्वप्नाळू, युवा जोकोवीच विम्बल्डन खेळतोय असेच वाटते'
- Ashes 2023 : बेन स्टोक्स लढला, पण संघ हरला
- नांदेड परिक्षेत्रातील ५८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढले आदेश
- पक्ष कसा फोडायचा? यावर पुस्तक लिहिण्याची वेळ : विजय वडेट्टीवार | Maharashtra political crisis

