

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात २१४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. एकट्या केरळमध्ये २ कोरोना मृत्यूची तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ६ ने वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ७९ हजार ७६१ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४६ हजार ५३४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ७१८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.१० टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.१२ टक्के नोंदवण्यात आला. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.१३ कोटी कोरोना डोस लावण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का ?