

पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूडची प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे धुमधडाक्यात लग्न केले. विकी आणि कॅटरिनाने लग्न थाटामाटात आणि दिमाखदार होईल, याची पुरेपूर काळजी घेतली होती.
या लग्नासाठी निमंत्रित १२० पाहुणे उपस्थित राहिले. कॅटरिनाने लग्नाला निमंत्रण देताना विशेष काळजी घेतल्याचे स्पष्ट जाणवत होते. कॅटरिनाने तिच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्यांच्यामुळे त्रास झाला त्या सर्वांना लग्नाला सांगण्याचे टाळल्याचे दिसून आले. या यादीत अर्थातच तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूर आणि सलमान खानचाही समावेश होता. मात्र, बॉलिवूड किंग शाहरुख खानला लग्नाची पत्रिका न दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
तिने शाहरुखला निमंत्रण का दिले नाही ? याबाबत अनेक आडाखे बांधण्यात आले. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते की, 'जब है जान जान' चित्रपटामध्ये शाहरुख खानने कतरिना कैफसोबत जबरदस्तीने किसिंग सीन घुसवला होता. जेव्हा कॅटरिनाला ही बाब समजली तेव्हा तेव्हा ती खूप संतापली होती. कदाचित शाहरुखला लग्नाचे आमंत्रण न देण्यामागे हे देखील एक कारण असू शकते असे बोलले जाते.
दुसरीकडे शाहरुख खानने स्वत:ला ऑन स्क्रीन कोणत्याही अभिनेत्रीला किस करायचे असा नियम घालून दिला होता. मात्र, त्याचा हा नियम जब तक है जान चित्रपटावेळी अपवाद ठरल्याचे दिसून आले. त्याने मोडलेल्या नियमाबाबत बोलताना म्हटले होते की, बळजबरीने किस घ्यावा लागला. कथेच्या मागणीनुसार तसे करावे लागल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, काही असले, तरी यामुळे कॅटरिना यामुळे चांगलीच दुखावली गेली हे लपून राहिले नाही.
त्यानंतर शाहरुख खानने दिलेल्या मुलाखतीमध्ये असेही म्हटले होते की, मी प्रामाणिकपणे सांगेन की, आदि (आदित्य चोप्रा, यशजी आणि कॅटरिनाला मी नम्रतेने धन्यवाद म्हटले पाहिजे. त्या सर्वांना माहीत होते की मला अवघल्यासारखं झालं होतं. मी सहजपणे काम करणार असलो तरी मला त्यावेळी अडचण झाली होती. मला ते कुटुंबाप्रमाणे आहेत. ते मला म्हणाले की, तुला तसं काही करायचं नाही, पण ते एकत्र आले आणि मला बळजबरीने किस करायला लावला आणि त्यांनी मला त्यासाठी मोबदला दिला.
हे ही वाचलं का ?