Imran Khan Shot During Political Rally : जाणून घ्या इम्रान खान यांच्या ‘आजादी मार्च’च्या या ५ गोष्टी

Imran Khan Shot During Political Rally : जाणून घ्या इम्रान खान यांच्या ‘आजादी मार्च’च्या या ५ गोष्टी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी (दि.३) गुजरानवाला येथे हल्ला झाला. इम्रान खान यांनी पाकिस्तानातील शाहबाज सरकारच्या विरोधात लाँग मार्च काढला आहे. त्यांचा हा मार्च इस्लामाबादच्या दिशेने जात होता तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पण, पाकिस्तानच्या सत्तेवरुन पायउतार होणारे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या शाहबाज शरीफ यांच्या सत्तेविरुद्ध हा 'आजादी मार्च' का काढला आहे हे जाणून घ्या खालील पाच मुद्द्यांच्या आधारे. (Imran Khan Shot During Political Rally)

  1. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायांना गोळी लागल्याने ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोळी चालवणाऱ्याला पकडण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे म्हणणे आहे की, हा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न होता. Imran Khan Shot During Political Rally
  2. मागील शुक्रवार पासून ७० वर्षांचे इम्रान खान आजादी मार्च नावाने रोड शो करत आहेत. याला त्यांनी आजादी लॉन्ग मार्च असे देखील म्हटले आहे. हा रोड शो लोहोर पासून इस्लामाबाद असा आहे. सध्या ते इस्लमाबादकडे जाणाऱ्या मार्गावर असताना त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. या त्यांच्या मार्च जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानात लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचा हा रोड शो यशस्वी ठरत असून त्यास लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  3. पाकिस्तानमधील सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर दबाव वाढविण्यासाठी व पीटीआय पक्षाचे जनमत बळकट करण्यासाठी इम्रान खान यांनी हा लॉन्ग मार्च काढला आहे. या मार्चला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद इम्रान खान यांना मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
  4. पाकिस्तानचे साडे तीन वर्षे पतप्रधान राहिल्यानंतर इम्रान खान त्यांच्या विरुद्ध आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव जिंकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली. या दरम्यान पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली होती आणि त्यांनी सर्व शक्तीशाली नेते व लष्काराचे देखील समर्थन गमावले होते.
  5. या आधी इम्रान खान यांनी म्हटले होते की, 'पाकिस्तानात एक क्रांती होत आहे, फक्त प्रश्न असा आहे की, ही क्रांती मतपेटीच्या आधारे होणारी सर्वसामन्य क्रांती असेल का ती रक्तरंजीत असेल?


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news