

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. महिला न्यायाधीश आणि एका पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपा खाली त्यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान यांच्या घराच्या बाहेर पीटीआय समर्थक आणि पाकिस्तानी पोलीस यांच्यात झटापट झाली. मोठ्या प्रमाणात दगड फेक करण्यात आली यात डझनभर समर्थक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसही जखमी झाले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांनी या संदर्भात ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी या प्रकरणी म्हंटलं आहे की, ज्या प्रकारे आम्हाला पोलिसांकडून टार्गेट केलं जात आहे. हा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. (Imran Khan)
इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांंमध्ये आणि इम्रान खान समर्थकांमध्ये हाणामारी झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराच्या कांड्या त्याचबरोबर लाठीचार्ज करण्यात आला. यात इम्रान खान यांचे समर्थक त्याचबरोबर इस्लामाबादचे पोलिस महासंचालक आणि अनेक पोलिस ही गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकाराला इम्रान खान यांनी लंडन प्लॅन म्हणतं आपला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी नवाझ शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हंटलं आहे की, मी लाहोर उच्च न्यायालयात १८ तारखेला न्यायालयात हजर राहीन असे हमीपत्र दिले आहे. पण ते मान्य झालं नाही. ते का मान्य झाले नाही, हे सर्वांना माहीत आहे. हा प्लॅन लंडन योजनेचा भाग आहे. नवाझ शरीफ यांच्यावर निशाणा साधत ते पुढे असेही म्हणाले की, माझ्यावर आणि माझ्या पक्षावर हल्ला केला जाईल आणि मला तुरुंगात टाकले जाईल, असे आश्वासन नवाझ शरीफ यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा