आम आदमी पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग. ( संग्रहित छायाचित्र )
आम आदमी पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग. ( संग्रहित छायाचित्र )

दुसरे काय करतात याची पर्वा नाही, मी अयोध्‍येला जाणारच : आप खासदार हरभजन सिंग यांची स्‍पष्‍टोक्‍ती

Published on

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : अयोध्‍येत सोमवार, २२ जानेवारीला रामलल्‍ला मूर्ती प्राणप्रतिष्‍ठा होणार आहे. या कार्यक्रमाला दुसरे काय करतात याची मला पर्वा नाही. मी श्री प्रभू रामांचे आशीवार्द घेण्‍यासाठी अयोध्‍येला जाणारच, असे आम आदमी पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी वृत्तसंस्‍था 'एएनआय'शी बोलताना स्‍पष्‍ट केले. ( AAP's Harbhajan Singh on Ram Mandir inauguration ) आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या विराेधात हरभजन यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

हरभजन सिंग म्‍हणाले की, "अयोध्‍येत रामलल्‍ला मूर्ती प्राणप्रतिष्‍ठा होणार आहे. या समारंभाला काँग्रेसला जायचे आहे की नाही किंवा इतर पक्षांनाही जायचे आहे की नाही, याने काही फरक पडत नाही. मी नक्कीच जाईन. एक व्यक्ती म्हणून माझी ही भूमिका आहे. जो देवावर विश्वास ठेवतो. कोणाला राम मंदिरात जाण्यात अडचण असेल, तर ते त्यांना हवे ते करू शकतात." ( AAP's Harbhajan Singh on Ram Mandir inauguration. )

आमचे सौभाग्य आहे की, राम मंदिर यावेळी बांधले जात आहे. आपण सर्वांनी जाऊन प्रभू रामाचे आशीर्वाद घेतले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. .मी नक्कीच (राम मंदिराच्या उद्घाटनाला) आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे. राम), "आप खासदार जोडले.

अयोध्‍येला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी अद्याप औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही. मात्र 22 जानेवारीनंतर पत्नी, मुले आणि पालकांसह मंदिराला भेट देणार असल्याचेही आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट केले होते. तसेच राम मंदिर हा भावना आणि भक्तीचा विषय आहे. त्येकाची आपापल्या धर्मानुसार स्वतःची श्रद्धा असते. त्यात राजकारण नसावे, असे सांगत त्‍यांनी भाजपवर टीका केली होती. आता त्‍याच्‍या पक्षाचे खासदार हरभजन सिंग यांच्‍या केजरीवाल यांच्‍या विरोधात भूमिका घेत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यास उपस्‍थित राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केल्‍याने आपसह राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news