ICC World Cup 2023 | ठरलं! भारत- पाकिस्तानचा सामना ‘या’ दिवशी

ICC World Cup 2023 | ठरलं! भारत- पाकिस्तानचा सामना ‘या’ दिवशी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेत १५ ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतात होणाऱ्या ICC वन- डे विश्वचषक २०२३ ची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धा ४६ दिवस चालणार असून ती १० ठिकाणी होणार आहे.

या स्पर्धेचा प्रारंभ ५ ऑक्टोबरला होईल. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होईल. २०१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड भिडले होते. हे दोन्ही संघ ५ ऑक्टोबरला पुन्हा एकमेकांशी भिडणार आहेत.

तर १५ ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान एकमेकाशी भिडणार आहेत. हा बहुप्रतिक्षित सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा आठवा सामना असेल. भारत आणि पाकिस्तान याआधी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये सात वेळा आमने-सामने आले होते.

भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सात लढती जिंकल्या आहेत. आजही भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या लढतीमध्ये अजिंक्य राहिला आहे. हे दोन्ही संघ ५० षटकांच्या विश्वचषकात २०१९ मध्ये इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे आमने-सामने आले होते. यावेळी भारताने रोहित शर्माच्या ११३ चेंडूत १४० धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ५ बाद ३३६ धावसंख्या उभारली होती. त्यानंतर एका उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला ६ बाद २१२ धावांवर रोखले होते. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताने ८९ धावांनी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार) विजय मिळवला होता. (ICC World Cup 2023)

यजमान भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. शोकेस इव्हेंटमध्ये एकूण १० संघ सहभागी होतील. पहिले आठ संघ क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे आधीच पात्र झाले आहेत. ९ जुलै रोजी संपणाऱ्या झिम्बाब्वेमधील पात्रता स्पर्धेच्या शेवटी दोन संघ निश्चित होणार आहे.

प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर नऊ संघांशी खेळतील. ज्यातील अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news