Virat Kohli ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर, विराट कोहलीला मोठा फायदा!

Virat Kohli
Virat Kohli
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli ICC Ranking : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. तो आता सातव्या क्रमांकावर आला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वनडेत त्याने अर्धशतक (54) फटकावले होते. या खेळीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अजूनही वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनू शकलेला नाही.

विराट कोहली काही काळापूर्वी वनडे क्रमवारीतील टॉप-10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर होता. मात्र, आता तो जबरदस्त कमबॅक करताना दिसत आहे. सध्या त्याचे वनडे रेटिंग 719 आहे. कोहलीने रोहित शर्माला मागे टाकले आहे. भारतीय कर्णधार 707 रेटिंगसह 8 व्या क्रमांकावर आहे. (Virat Kohli ICC Ranking)

वनडे क्रमवारीत शुभमन गिलला नुकासान झालेले नाही. तो पाचव्या क्रमांकावर आहे. बाबर आझम अजूनही वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज आहे. त्याचे रेटिंग 887 वर गेले आहे. रासी व्हॅन डर डुसेन 777 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाकिस्तानचा इमाम-उल-हक आहे. चौथ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे रेटिंग 740 आहे. (Virat Kohli ICC Ranking)

जोश हेझलवूड नंबर वन गोलंदाज

जोश हेझलवूड 705 रेटिंगसह वनडे गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ट्रेंट बोल्ट (701) दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. त्याचे रेटिंग 691 आहे. आणि चौथ्या क्रमांकावर मिचेल स्टार्क आहे.

यंदाच्या वनडे क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानने (659) चमकदार कामगिरी केली आहे. तो जगातील टॉप 5 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 392 आहे. तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (310) दुस-या स्थानी आणि राशिद खान (280) तिसऱ्या स्थानी आहेत. टीम इंडियाचा एकही खेळाडू अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news