Serial killer : ‘या’ सीरियल किलरने १८ वर्षांत १८ महिलांची केली हाेती हत्या

Serial killer : ‘या’ सीरियल किलरने १८ वर्षांत १८ महिलांची केली हाेती हत्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तो (Serial killer) एखाद्या दुकानात किंवा ताडी पिण्याच्या ठिकाणी जायचा. तिथे आलेल्या एका महिलेल्या आपल्या जाळ्यात ओढायचा. महिलाही त्याच्यावर विश्वास ठेवायची. तो अज्ञात ठिकाणी त्या महिलेला घेऊन जायचा. तिच्यासोबत लैगिंक इच्छा पूर्ण करायचा अन् इच्छापूर्ती झाली की, त्याच महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरायचा, नंतर त्या महिलेचा गळा दाबायचा. ते शक्य झालं नाही तर, मोठा दगड घ्यायचा आणि दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या करायचा. आता तुम्ही म्हणाल की, या गुन्हेगाराने एखादी-दुसरी हत्या केली असेल. पण, तुमचा अंदाज चुकतोय… या विकृत गुन्‍हेगाराने  त्याने एक नाही, दोन नाही तर तब्बल १८ वर्षांत १८ महिलांची हत्या केलीय. अहो! याचं डोकं इतकं चालाख होतं की, हत्या प्रकरणात पोलिसांच्या आणि जेलरच्या हातावर तुरी देऊन चक्क दोनवेळा कारागृहात बाहेर पडून पुन्हा त्याने हत्याकांड घडवून आणलेत.

१८ महिलांची हत्या करणारा गुन्हेगार कोण आहे? 

या गुन्हेगाराचं नाव आहे एम. रामुलू. हा सगळा हत्याकांड हैदराबादमध्ये घडवून आणलाय त्याने. रामुलू हा संगारेड्डी जिल्ह्यातील कांडी मंडल गावातील आहे. २१ व्या वर्षी त्याचं लग्न झालेलं होतं. पंरतु काही दिवसांतच त्याची बायको त्याला सोडून गेली. नंतर त्याने दुसरं लग्नही केलं. मात्र, तिही त्याला सोडून गेली. या रामुलूवरच १८ महिलांची हत्या करण्याचा, तुरुंगातून पळून जाण्याचा आणि चोरी करण्याच्या गुन्हा दाखल होते.

एम. रामुलूने यापूर्वीच्या हत्या कधी केल्या?

२००३ साली तूरपान पोलीस ठाण्याच्या हद्दीत, २००४ साली रायादुर्गाम पोलीस ठाण्याच्या हद्दीत, २००५ साली संगारेड्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, २००७ साली रायदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत, २००८ साली नसरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक, तर २००९ साली कुकाटपल्ली पोलीस ठाण्यात सलग दोन महिलांची हत्या करून हा एम. रामुलूने महिलांना जीवे मारण्याचा सपाटाच लावलेला होता.

एम. रामुलूने जेव्हा ९ व्या महिलेची हत्या (Serial killer) केली होती तेव्हा पोलिसांना त्यांना पकडता येत होतं. मात्र, पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. जेव्हा नरसंगी आणि कोकटपल्ली परिसरात महिलांच्या हत्या झाल्या आणि त्यात साम्य आढळले. तेव्हा मात्र, पोलीस खडबडून जागी झाली आणि प्रकरण गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. या तपास कसून केला, चाैकशी केली तेव्हा हा मोठा हत्याकांड पोलिसांसमोर आला. पोलिसांनी त्वरीत आरोपपत्र दाखल केलं.

एम. रामुलूचा तुरुंगातून पळून जाण्याचा भन्नाट प्लॅन 

२००९ साली नरसंगी आणि कोकटपल्लीमध्ये केलेल्या हत्या प्रकरणात एम. रामुलूला २०११ ला रंगारेड्डी कोर्टाने दोषी ठरवलं. तेव्हा त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आणि आजीवन कारावासात एम. रामुलूला धाडलं. पण, रामुलू हा चलाख होता. कारागृहात जाण्यापूर्वीच डोक्यात एक प्लॅन ठेवून गेलेला होता. त्याने कारागृहात वेड्यासारखं वागायला सुरुवात केली.

त्याने आजारी असल्याचं नाटक केलं. तुरुंग अधिकाऱ्यांनादेखील ते खरं वाटलं. त्यांनी एरागट्टा मेंटल हाॅस्पिटलमध्ये भरती केलं. रामुलूने हाॅस्पिटलमध्ये निवांतपणे एक महिना काढला. याच्या डोक्यातल्या प्लॅनने वेग धरला. ३० डिसेंबरची रात्र लक्षात घेऊन त्याने हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या आणखी पाच कैदांनासोबत घेऊन धूम ठोकली.

पुन्हा रामुलूकडून महिलांच्या हत्याकांडाला सुरुवात…

तुरुंगातून पळू गेल्यानंतरही पुन्हा त्‍याने महिलांची हत्या करायला सुरुवात केली. २०११ मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बोवेनपल्लीमध्ये २०१२ आणि २०१३ साली दोन महिलांची हत्या केली. इतकंच नाही तर, २०१२ साली रामुलूने चंदानगरमध्ये एका महिलेची, डुंडीगलमध्ये दोन महिलांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या हत्याकांडावर लक्ष देण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी पुन्हा २०१३ साली मे महिन्यात रामुलूला (Serial killer) पकडलं. कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. २०१८ साली त्याने आपल्या वकिलाच्या मदतीने शिक्षा कमी करून घेतली. इतकंच नाही तर, ऑक्टोबर २०१८ साली न्यायालयाने त्याची सुटका केली. पुन्हा बाहेर येऊन त्याने महिलांची हत्या करण्यास सुरुवात केली.

२०१९ साली शमीरपेटमध्ये एका महिलेची, पट्टन चेरुवुमध्ये आणखी एका महिलेची हत्या केली. २०१९ पर्यंत तब्बल १६ महिलांची हत्या रामुलूने केलेली होती. त्याला पोलिसांनी पकडलं आणि पुन्हा जुलै २०२० साली तो सुटून बाहेर आला. आणि पुन्हा दोन महिलांची हत्या घडवून आणल्या.

शेवटच्या दोन महिलांच्या हत्या आणि रामुलूच्या हत्याकांडचा पर्दाफाश

युसूफगुडाच्या कंपाऊंडमध्ये ३० डिसेंबरच्या रात्री काही जण ताडी पीत बसलेले. प्रत्येक जण आपल्याच नशेत धुंद झालेला. या पिणाऱ्यांमध्ये पन्नाशी गाठलेली महिलादेखील होती. त्यात रामुलू होता. हळूहळू त्याने महिलेशी जवळीक साधली. तिच्यासोबत  गप्पा मारू लागला. गप्पा मारत मारत हे दोघेही बाहेर पडले.

शांत ठिकाणी जायच्या उद्देशाने दोघेही चालू लागले. चालत-चालत ते दोघे घाटकेश्वरजवळील अंकुशपूरला पोहोचले. दोघेही नशेत धुंद असल्यामुळे बोलता-बोलता दोघांच्यात वाद सुरू झाला. वादाने टोक गाठले. रामुलूने सरळ बाजूचा दगड उचलला आणि त्या महिलेला ठेचायला सुरुवात केली. महिलेचा जीव गेल्यानंतर तेथून त्याने धूम ठोकली.

अशीच साम्य दर्शवणारी घटना २० दिवसांपूर्वी बालानगरमध्ये ताडी कंपाऊंटमध्ये घडलेली होती. चाळशीच्या वयातील महिला आणि रामुलू खूप ताडी प्यायले. नशेच्या धुंदीत दोघे गप्पा मारू लागले. गप्पा मारत हे दोघे शांततेच्या ठिकाणी जाऊ लागले.ते सेंगारेड्डी जिल्ह्याच्या मुलूग परिसरातील सिंगायापल्ली गावात पोहोचले. पुन्हा दोघांनी दारू प्यायला सुरू केली. लैंगिक इच्छा भागवून घेतली. रामुलूने महिलेच्या अंगावरील साडी काढली आणि सरळ त्याच साडीनेच तिचा गळा दाबला. आणि तेथूनही धूम ठोकली. या दोन घटनाच रामुलूच्या सीरियल किलिंगला फुलस्टाॅप देणाऱ्या ठरल्या.

पोलीस रामुलूपर्यंत कसे पोहोचले? 

जुबिली हिल्स पोलीस ठाण्यात ५० वर्षांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने नोदंवलेली होती. घाटकेश्वर पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला. हैदराबाद आणि राचनकोंडा पोलिसांनी चर्चा केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. कॅमेऱ्यामध्ये रामुलूचे एका महिलेशी बोलताना दिसला. पोलिसांची शंका गडद झाली फुटेज व्यवस्थित तपासले.

तपासाची चक्रे वेगात पळू लागली. पोलिसांनी २००९ सालच्या रामुलू दोषी ठरलेल्या हत्या प्रकरणातील फुटेज तपासली. पोलिसांचा संशय आणखी गडद झाला. घाटकेश्वरमध्ये ज्या ५० वर्षीय महिलेची हत्या आणि आतापर्यंत केलेल्या अनेक महिलांचा हत्या यांच्यामध्ये साम्य आढळून आले. पोलिसांनी आधीची प्रकरणं व्यवस्थित तपासली. या सर्व हत्या एम. रामुलूनेच केला असल्याचे समोर आले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news