

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन; हैदराबादमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. दोघे मित्र एकाच मुलीवर प्रेम करत होते. यातील एकाने मुलीला मेसेज आणि कॉल केला होता. या रागातून दुसऱ्या २२ वर्षीय युवकाने त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली. जो आधी त्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. धक्कादायक म्हणजे आरोपीने त्याच्या मित्राचा गळा कापून त्याचे धड शिरापासून वेगळे केले. तसेच त्याचे हृदय काढून टाकले आणि त्याने त्याचे गुप्तांगही कापले. त्यानंतर त्याने त्याची बोटेही छाटली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. (Hyderabad Crime)
पोलिसांनी आरोपीच्या जबाबावरून गुन्हा नोंदवून सविस्तर तपास सुरू केला आहे आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तो स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि हरिहर कृष्णा यांनी दिलसुखनगर येथील कॉलेजमध्ये एकत्र इंटरमीडिएट पूर्ण केले आहे. जिच्या प्रेमात पडल्याने ही घटना घडली ती मुलगीही याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. दोघेही मुलीच्या प्रेमात पडले. नवीनने पहिल्यांदा तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आणि तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. पण काही वर्षांनंतर दोघांचा ब्रेकअप होऊन ते वेगळे झाले.
त्यानंतर त्या मुलीला हरिहर कृष्णाने प्रपोज केले आणि तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. पण ब्रेकअप होऊनही नवीन सतत त्या मुलीच्या संपर्कात होता. तो तिला मेसेज पाठवायचा आणि कॉलही करत होता. ज्यामुळे कृष्णा खूप अस्वस्थ झाला होता.
दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी या दोघांमध्ये मोठे भांडण झाले. यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. कृष्णाने नवीनचा गळा दाबून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने त्याचे धड शिरापासून वेगळे केले. त्यानंतर त्याचे हृदय बाहेर काढले आणि गुप्तांगही कापले. त्यानंतर त्याने त्याची बोटे छाटली. दरम्यान "या घटनेचे आरोपीने कथितपणे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅपवर त्याच्या मैत्रिणीला पाठवले." या घटनेने हैदराबाद हादरले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Hyderabad Crime)
हे ही वाचा :