

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी नूतन सागर साबळे (वय २३ वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय ४५ वर्षे)अशी मयतांची नावे आहेत. कात्रड गावामधे रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने वार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या मयत नूतन यांच्या भावाला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती भावाने राहुरी पोलिसांना दिली. उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, पोलीस उप निरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
हेही वाचा :