कॉलेजच्या फी साठी रस्त्यावर गाणाऱ्या तरुणाला हृतिक रोशनचा कडक सॅल्युट (video)

कॉलेजच्या फी साठी रस्त्यावर गाणाऱ्या तरुणाला हृतिक रोशनचा कडक सॅल्युट (video)
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: म्युझिक कॉलेजची फी भरण्यासाठी एका तरुणाने चक्क रस्त्यावर गाणे गायिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कुणाल कपूरसह अनेकांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

नुकताच सोशल मीडियावर शकील नावाच्या एका तरुणाचा गिटार घेवून गाणे गातानाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शकीलने १९९० च्या 'जुर्म' चित्रपटातील 'जब कोई बात बिगड़ जाये' हे गाणे गायिले आहे.

या गाण्याचा व्हिडिओ २.१० मिनिटांचा असून सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यात शकीलच्या आजूबाजूला काही लोकांची गर्दी दिसून येत आहे. यासोबत त्याच्याजवळ एक साइनबोर्ड असून त्या बोर्डवर अनेक ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म दिसत आहेत. तसेच शकीलच्या मदतीसाठी योगदान देणाऱ्यासाठी  क्यूआर कोडदेखील आहे.

कॉलेजची फी भरण्यासाठी गाणे गायिले

मदत करणाऱ्यासाठी त्याने साइनबोर्डजवळ 'तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, हे योगदान माझ्या म्युझिक स्कूलची फी भरेल', असा संदेश लिहून आहार मानले आहेत. हा व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल होताच ६४ हजारांहून अधिक ह्युज मिळाले आहेत.

हृतिक रोशनने केलं कौतुक

शकीलच्या व्हिडिओला चाहत्यासोबत अभिनेता हृतिक रोशन आणि कुणाल कपूर यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. कुणालने या व्हिडिओला रिट्विट करत 'हुशार! तुम्ही जिथे असाल तेथून तुम्ही या अत्यंत प्रतिभावान आणि नाविन्यपूर्ण संगीतकाराला पाठिंबा देऊ शकता. यूपीआय आणि तंत्रज्ञानाची शक्ती, ' असे कॅप्शमध्ये लिहिले आहे.

याशिवाय कुणालसोबत हृतिक रोशनने हा व्हिडिओ रिट्विट करत शकीलच्या गायन कौशल्याने मी प्रभावित झालो आहे, असे म्हटले आहे.
यानंतर शकीलने पुन्हा इंन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत त्याने सर्वाचे आभार मानले आहेत. यात त्याने 'सर, तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्याने माझे आयुष्य बदलले आहे, याबद्दल मला प्रत्येकाला धन्यवाद मानायचे आहेत.मला प्रोत्साहित करून माझ्या कार्यात योगदान दिल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. मला जे आवडते ते करण्यात मी धन्य आहे. तसेच आजपर्यंत मी काय करतो हे कोणालाही माहित नव्हते, मी तुम्हाला सांगतो की, मी एक बसकर (स्ट्रीट परफॉर्मर) असून मला त्याचा अभिमान आहे.' असे शकीलने म्हटले आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news