

पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाची. मागील दोन वर्ष संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी झुंजत आहे. मात्र कोरोनाबरोबरच अन्य रोगांचाही धोका कायम आहेच. पावसाळया पाठोपाठ हिवाळ्यातही फ्लूचा संसर्ग ( Flu in winter ) वाढतोच. जाणून घेवूया फ्लूला प्रतिबंध करणार्या टिप्स…
इन्फ्लूएंझा विषाणूमुळे फ्लू होता. हा एक संसर्गजन्य आजार आहे. हिवाळ्यामध्ये याचा संसर्ग होण्याचा प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील उत्तरेकडील राज्यात विशेषत: जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये फ्लू संसर्गाचे प्रमाण अधिक असते. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यातही याचा संसर्गाचा धोका असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( आयसीएमआर ) संशोधनातही स्पष्ट झाले आहे.
तापमानात होणारा बदल, पाउस, हवामानातील आर्दता, थंड आणि कोरडे हवामानात फ्लूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतो.
हिवाळ्यात फ्लू संसर्गवाढण्याचे कारण म्हणजे, इन्फ्लूएंझा विषाणू हा थंड आणि कोरड्या हवामानात अधिक सक्रीय असतो. ताप येणे, नाक चोंदणे, डोकेदुखी, अंगदुखी, कोरडा खोकलासह थकवाही येतो. रुग्णांना हा त्रास एक ते दीड आठवडे राहतो. हिवाळ्यात फ्लूचा संसर्ग होणे ही कॉमन बाब आहे. फ्लू झालेल्याच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींनाही याची बाधा होण्याची शक्यता असते.
देशात या वर्षी जुलै महिन्यात फ्लू संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. फ्लू प्रतिबंधक लस घेणे अत्यावशयक आहे, असे मागील काही वर्ष सार्वजनिक आरोग्य विभाग वारंवार स्पष्ट करत आहे. मात्र आपल्याकडे विविध गैरसमजांमुळे लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येते. आपल्या देशात फ्लूची साथ ही वारंवार येते. या विषाणूचे व्हेरियंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने उपचारामध्ये बदल करावे लागतात.
सध्या आपल्या देशात ए आणि बी टाईप इन्फ्लूएंझा विषाणू आहेत.हिवाळ्यामध्ये ए टाईप इन्फ्लूएंझा विषाणूमुळे फ्लूचा संसर्ग होतो.फ्लू एक प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे. विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल करतोच त्यामुळे तुम्ही दरवर्षी फ्लू प्रतिबंधक लस घेवून आपली प्रतिकार शक्ती वाढवणे अनिवार्य आहे. लस घेतल्यामुळे फ्लूचा धोका कमी होतो,त्यामुळे आरोग्याच्या काळजीबरोबरच फ्लूची लस घेणेही आवश्यक आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :