

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अद्यापही शिल्लक आहेत. यामुळे स्वयंपाक घरातील मुलांची लुडबूड वाढली आहे. आईकडे मुले काही ना काही गोड खाऊ मागत अशतात. घरातील अनेक स्वीट पदार्थासोबत शिरा, आईस्क्रिम, गोड दूध खाऊन मुले कंटाळतात. आता अशावेळी कोणता खाऊ बनवायचा असा प्रश्न पडतचं असतो. मग, एक खास रेसिपी घरच्या घरी करून पाहा. फक्त दूध आणि साखरेपासून हॉटेलसारखी रसमलाई ( Rasmalai ) घरच्या घरी करून पाहा. यासाठीचे साहित्य आणि कृती काय आहे जाणून घेवूया.
रसमलाई बनवण्यासाठी साहित्य-
दूध – ३ लिटर
साखर – अर्धा किलो (५०० ग्रॅम)
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर – २ चमचा
पाणी – ३ ग्लास
केशर- थोडसे
बारिक केलेले ड्रायफूट- अर्धा कप
वेलदोडे पावडर – १ चमचा
फ्रूटकलर
रसमलाई बनवण्याची कृती-
१. पहिल्यांदा एक कढई गॅसवर ठेवून त्यात २ लिटर दूध तापण्यासाठी ठेवावे.
२. दूध चांगले तापल्यानंतर त्यात दोन चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून हलवावे.
३. गॅस बंद करावा. दुधात लिंबू किंवा व्हिनेगर टाका. त्यामुळे २-३ मिनिटांत दूध फाटेल.
४. फाटलेल्या दुधातील पाणी एका सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे.
५. कापडात शिल्लक राहिलेल्या मिश्रणातील पाणी पिळावे. (पाणी नितळण्यासाठी ठेवावे)
६. यानंतर दुसऱ्या एका भांड्यात उरलेले एक लिटर दूध घेऊन ते तापत ठेवावे.
७. दूध चांगले तापल्यानंतर त्यात केशर, वेलदोडे पावडर, बारिक केलेले ड्रायफूट, थोडंस फ्रूटकलर आणि ४०० ग्रॅम साखर घालून ४-५ मिनिटांपर्यंत शिजवावे.
८. कापडात बांधून ठेवलेले मिश्रण एका प्लेटमध्ये घेऊन ते चांगले मळावे. (आवश्यक असल्यास पाणी घालावे)
९. यानंतर छोटे- छोटे गोळे तयार करून हलक्या हातांनी दाबून ते चपटे करावेत.
१०. कढईत तीन ग्लास पाणी घेऊन त्यात १०० ग्रॅम साखर घालून त्याचा पाक बनवावा.
११. साखरेच्या पाकात तयार केलेले रसमलाईचे गोळे सोडून चागंले शिजवावे.
१२. यानंतर एका भांड्यात पाकातील रसमलाई आणि त्यावर तयार केलेले ड्रायफूटचे मिश्रण घालावे.
मस्त चवदार गोड गोड रसमलाई तयार होईल. ( Rasmalai )
हेही वाचा :