

त्वचेला उजाळा देणारे, त्वचेचा तेलकटपणा कमी करणारे, त्वचेवरील डाग, काळेपणा कमी करण्यास उपयोगी ठरणारे आणि त्वचेचा कस वाढविणारे असे अनेक पॅक किंवा लेप फार वेळ वाया न घालविता घरच्या घरी तयार करता येतात. असे लेप चेहर्यावर लावल्याने, लेप आणि त्वचा यांच्यादरम्यान निर्वात पोकळीने त्वचेचा बाहेरील भाग थोडा खेचला जातो. त्यामुळे त्वचेलगतचे रक्ताभिसरण वेगाने होऊ लागते आणि त्वचेला पोषक द्रव्यांचा अन्नपुरवठा होऊन त्वचा टवटवीत आणि ताजी दिसू लागते. (Home Made Facepack )