

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील आगामी 'पश्मिना – धागे मोहब्बत के' मालिका आपल्या प्रेमकथेने मंत्रमुग्ध करून टाकणार आहे. काश्मीरच्या नेत्रदीपक खोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मालिकेचे कथानक उलगडते. हा अनुभव प्रेक्षकांना या भागातील सौंदर्यात सामावून घेणारा ठरेल. मालिकेत इशा शर्मा ही पश्मिना तर निशांत मलकानी हा राघवची भूमिका साकारत आहे. प्रेमाबाबत त्यांची मते अगदीच परस्परविरोधी आहेत. तरी ते नियतीमुळे एकत्र जोडले जातात.
संबंधित बातम्या-
मालिकेला एक लक्षवेधी कलाटणी देत हितेन तेजवानी हा अविनाश शर्मा या भूमिकेत प्रवेश करत आहे. त्याची व्यक्तिरेखा ही आत्मकेंद्री वृत्तीची आहे. नियंत्रण मिळवण्याची आणि प्रभाव पाडण्याची त्याच्यात तीव्र लालसा असते. त्याचे राघवसोबत घट ऋणानुबंध असतात. राघवच्या कुटुंबात आपली जागा कुणीही घेऊ शकत नाही, यावर त्याचा अगदी ठाम विश्वास आहे.
मालिकेत अविनाश शर्माची व्यक्तिरेखा चितारत असलेला हितेन तेजवानी म्हणाला की, "अविनाश शर्माचे पात्र साकारणे हे एकाच वेळी चित्तथरारक आणि तितकेच आव्हानात्मक होते. कारण त्याच्या व्यक्तिरेखेला महत्त्वाकांक्षा आणि धूर्तपणाचे अनेक थर आहेत. नकारात्मक छटा असलेल्या पात्राची भूमिका साकारणे हे खूपच रोचक आहे. हा मी आणि माझ्या चाहत्यांसाठी अगदीच नवा अनुभव होता. कारण दूरचित्रवाणीवर त्यांनी मला अशा भूमिकेत आजवर कधीही पाहिलेले नाही. अविनाशच्या भूतकाळाबाबतचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्या आयुष्यात काश्मीरचे किती महत्त्व आहे, हे पाहणे प्रेक्षकांसाठीही मोठे मनोरंजक ठरणार आहे."
पश्मिना मालिका ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे.