

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याला आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने येत्या 27 तारखेपर्यंत सर्व पक्षकारांकडून मत मागविले आहे. त्यानंतर नियमित सुनावणी 2 ऑगस्टपासून घेतली जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
कलम 370 संदर्भातील याचिकांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, त्यावर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पक्षकारांकडून 27 तारखेपर्यंत जी प्रतिज्ञापत्रे दाखल करतील, ती अंतीम असतील, त्यात पुन्हा सुधारणा करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा