शाह फैजल यांनी ‘कलम 370’ रद्द करण्याबाबतची याचिका घेतली मागे | पुढारी

शाह फैजल यांनी 'कलम 370' रद्द करण्याबाबतची याचिका घेतली मागे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कलम 370 ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे, असे सांगत आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयातील यासंदर्भातील याचिका मागे घेतली आहे. जम्मू काश्मीरला प्राप्त असलेले कलम 370 केंद्र सरकारने 2019 साली संपुष्टात आणले होते. त्या निर्णयाला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या, त्यात फैजल यांच्या याचिकेचाही समावेश होता.

माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी कलम 370 ही आता भविष्यकाळातील गोष्ट झाली आहे. झेलम आणि गंगा नदी कायमसाठी हिंद महासागरात विलीन झाली आहे. त्या परत येऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी फैजल यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. फैजल यांनी जानेवारी 2021 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देत जम्मू-कश्मीर पीपल्स मुव्हमेंट नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. काश्मीरचे रहिवासी असलेले फैजल हे 2010 साली आयएएस परीक्षेत प्रथम आले होते. दरम्यान, कलम 370 रद्द करण्यास आव्हान दिलेल्या अन्य याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button