

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांची काही दिवसांपूर्वी ४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. (Health Minister)
सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते साहिब सिंग यांनी ट्वीट करत जैन यांच्यावर टीका केली आहे. इमानदारीचे ढोंग करत असलेल्या दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना ईडीकडून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे साहिब सिंग म्हणाले आहेत. (Health Minister)