

पुढारी ऑनलाईन डेस्क : रितेश देशमुख मराठी आणि बॉलिवूड अभिनेता आहे. तो एख उत्तम चित्रपट निर्मातादेखील आहे. अनेक हिट चित्रपट दोऊन त्याने मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवलीय. (HBD Riteish Deshmukh ) लय भारी असो वा वेड, मस्ती असो वा हाऊसफुल ४ अनेकविध चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रिपोर्टनुसार, त्याचे घर मुंबईतील वरळी येथे आहे. पॉश एरियामध्ये हा आलिशान बंगला आहे. (HBD Riteish Deshmukh )
संबंधित बातम्या –
सुरुवातीला बंगल्यात गेल्यानंतर भव्य प्रवेशद्वार दिसेल. जे युरोपियन स्ट्रक्चरचे वाटेल, त्यास पांढरा रंग देण्यात आला आहे. बगल्याची प्रशस्त इमारतदेखील सुंदर आहे.
घराला रॉयल लूक देण्यासाठी मेन जिना आणि व्हाईट टच देण्यात आला आहे. याची झलक रितेशची पत्नी जेनेलियाने शेअर केली होती.
बंगल्यात लिव्हिग रूम आहे. याठिकाणी ग्रे कलरचे सोफे आहेत. तर भिंती चॉकिलेटी रंगाच्या दिसतात.
सोबतच लिव्हिंग रूममध्ये रितेशने आपल्या वडिलांचा एक फोटो लावला आहे.
रिपोर्टनुसार, रितेश आणि जेनेलियाच्या खोलीमध्ये वुडन वॉर्डरोब, फ्लोरिंग आहे. याठिकाणी या कपलने अनेदा फोटो क्लिक केले आहेत.
रितेशच्या बंगला परिसरात एक मोठी बाग आहे. येथीला काही फोटो रितेशच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतात.
घरामध्ये जेनेलिया अनेकदा फोटोशूट करते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती फोटो शेअर करत असते.
घरामध्ये अनेक पारंपरिक खुर्च्या, टेबल, वस्तू पाहायला मिळतात.इन-हाऊसमध्ये जिम देखील दिसेल.
बंगल्यातील सर्व खोल्या विविध आकर्षक वस्तूंनी सजवलेले आहे.