पुणे: शाळा, कॉलेज परिसरात गिरट्या मारणार्‍या रोडरोमिओंची धरपकड

पुणे: शाळा, कॉलेज परिसरात गिरट्या मारणार्‍या रोडरोमिओंची धरपकड
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शाळा, कॉलेजमध्ये येणार्‍या मुली, तरूणींमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने शुक्रवारी हडपसर पोलिसांनी अचानकपणे शाळा, कॉलेज परिसरात भेट दिली. यावेळी रोड रोमिओगिरी करणार्‍यांची धरपकडही हडपसर पोलिसांनी केली. यावेळी पोलिसांनी हटकलेला एक तरूण खुनाच्या प्रयत्नातील संशयीत आरोपी निघाला. त्याच्यावर हडपसर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

शहरात पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यात शहरातील गुंडांची झाडा झडती, वेळोवेळी राबिविण्यात येणारे कोंबींग ऑपरेशन, स्थापन करण्यात आलेली दामिनी पथके अशा सर्व योजना राबविल्याच्या धर्तीवरच पुणे पोलिसांना तीन दिवसांपूर्वी राजस्थान येथील बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपी सापडले. त्याच धर्तीवर हडपसर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांनी हडपसर येथील शाळा कॉलेज परिसरात भेट दिली. यावेळी काही मुलांची धरपकड केली. त्यावेळी कारण नसताना फिरणार्‍या रोडरोमिओंना यावेळी पोलिसी खाक्या देखील दाखविण्यात आला. विनाकारण फिरणार्‍या रोडरोमिओंचा अशा पध्दतीने घेतलेल्या समाचारावर शालेय मुली आणि कॉलेज तरूणींनी समाधान व्यक्त केले. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे आणि पोलिस कर्मचारी प्रकाश सावंत, निलेश किरवे, प्रमोद ढाकणे, अमोल मंकराज, मनोज सुर्वे, अनिरुद्ध सोनवणे यांनी यावेळी रोडरोमिओंची धरपकड केली.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा कॉलेज परिसरात शुक्रवारी दुपारी केलेल्या पेट्रोलिंग दरम्यान काही रोडरोमियोंना हटकले. दुचाकीवर विनाकारण गिरट्या मारणार्‍यांना दोघांना यावेळी हटकले असता त्यातील एकजण हा खुनाचा प्रयत्न व गंभीर जखमी केल्याचा अशा दोन गुन्ह्यात जामीनावर होता. त्याच्या गाडीवरही तब्बल साडेपाच हजारांचा दंड होता. तो दंड त्यांना भरण्यास सांगून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले.
– विश्वास डगळे, गुन्हे निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news