

पुढारी ऑनलाईन :
ज्ञानवापी मशीद हटवण्याची मागणी करणारी नवी याचिका वारणसीच्या दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मशीद ही मूळ मंदिरावर बांधण्यात आली असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. भगवान आदी विश्वेश्वर विराजमान यांच्यावतीने किरण सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे.
किरण सिंग यांनी Next Friend या भूमिकेतून ही याचिका दाखल केली असून, त्या आदी विश्वेश्वराच्या भक्त आहेत. आदी विश्वेश्वर या जमिनीचे मालक आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. याशिवाय याचिकाकर्त्यांना या परिसरात प्रवेश करणे, पूजा करणे, आरती करणे यासाठी रोखले जाऊ नये, असे निर्देश द्यावेत असे या याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने मानबहाद्दूर सिंग, शिवम गौर, हिमांशू तिवारी, एस. एन. चतुर्वेदी, अनुष्का तिवारी हे वकील ही केस लढवत आहेत.