

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची अंतिम यादी बुधवारी (दि.१६) जाहीर केली. भाजपने आता सर्वच्या सर्व 182 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. अंतिम यादीत खेरालू मतदारसंघातून सरदारसिंग चौधरी, मानसामधून जयंतीभाई पटेल तर गरबाडा मतदारसंघात महेंद्रभाई भाभोर यांना संधी दिली आहे.
गुजरात विधानसभेच्या 89 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी तर 93 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारांची चौथी यादी गेल्या शुक्रवारी जारी केली होती. काँग्रेसकडून आतापर्यंत 104 नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाने तिसऱ्या यादीतील एक नावदेखील बदलले होते. काँग्रेसच्या चौथ्या यादीत ज्या प्रमुख नावांचा समावेश होता, त्यात मलूभाई कंडोरिया – द्वारका, रेवतसिंग गोहिल – भावनगर ग्रामीण, बलदेव सोलंकी – भावनगर पूर्व आणि जयकांतभाई पटेल – भरुच यांच्या नावांचा समावेश होता.
हेही वाचलंत का ?