Grammys 2023 : भारताच्या रिकी केजची ग्रॅमी पुरस्कारावर तिसऱ्यांदा मोहर

 Grammys 2023 : भारताच्या रिकी केजची ग्रॅमी पुरस्कारावर तिसऱ्यांदा मोहर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा म्युझिक कंपोझर रिकी केज याने ग्रॅमी पुरस्कारावर तिसऱ्यांदा मोहर उमटवली आहे. त्याच्या डिव्हाईन टाइड्ससाठी (Divine Tides) सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्याने आणखी एका विक्रम केला आहे. रिकी केज आतापर्यंत तीन ग्रॅमी पुरस्कार मिळवणारा एकमेव भारतीय ठरला आहे. रिकी केजने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर फोटो शेअर करत म्हटले आहे.," खूप आभारी आहे, माझा 3रा ग्रॅमी पुरस्कार."( Grammys 2023)

ग्रॅमी पुरस्कार भारताला समर्पित

संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे ग्रॅमी पुरस्कार २०२३ ला सुरुवात आज सकाळी ५.३० (भारतीय वेळ) पासून सुरु झाली आहे.  यावेळी भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी ६५व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे. रिकी केजने याआधीही ग्रॅमी अवॉर्ड दोनदा जिंकला आहे. आता त्याला तिसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांने भारताला समर्पित केला आहे.

 Grammys 2023 :आता पर्यंत तीन ग्रॅमी पुरस्कार 

रिकी केज यांना आतापर्यंत तीनवेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांना पहिला पहिला ग्रॅमी पुरस्कार २०१५ मध्ये विंड्स ऑफ संसारासाठी ( (Winds of Samsara))  मिळाला होता. त्यानंतर त्यांना दुसरा ग्रॅमी पुरस्कार लॉंस वेगासमध्ये झालेल्या ६४ व्या  गॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज आणि त्यांचा सहकारी स्टीवर्ट कोपलॅंड यांना मिळाला. हा पुरस्कार न्यू एज अल्ब्म श्रेणीतील 'डिव्हाईन टाइइस' या अल्बमसाठी  मिळाला होता.

डिव्हाईन टाइड्स नऊ गाण्यांचा अल्बम

रिकी केज यांना 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी पुरस्कार मिळाला आहे. या अल्बममध्ये नऊ गाण्यांचा समावेश आहे. हा अल्बम व्यक्ती आपल जीवन समतोल राहण्यासाठी कशी भूमिका घेतो याचा शोध घेतो. या अल्बममध्ये जगभरातील कलाकारांचा समावेश आहे. वैविध्यपूर्ण संगीत असलेला हा अल्बम मानवी जीवन बदलाशी कस जुळवून घेतो हे सांगतो.

 Grammys 2023
 Grammys 2023

 

View this post on Instagram

 

A post shared by Ricky Kej (@rickykej)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news