मडगाव : ‘कब्रस्तान’ च्या जागेचा झोन का बदलला?

मडगाव : पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,दामू नाईक,उल्हास तुयेकर व इतर उमेदवार.
मडगाव : पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,दामू नाईक,उल्हास तुयेकर व इतर उमेदवार.
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सासष्टीतील अल्पसंख्याक मतदारांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे. हिंमत असल्यास विजय सरदेसाई यांनी 'कब्रस्तान'च्या जागेचा झोन का बदलला हे जाहीर करावे, असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

मडगावात भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी फातोर्डाचे उमेदवार दामू नाईक, नावेलीचे उमेदवार उल्हास तुयेकर, वेळ्ळीचे उमेदवार सावियो रॉड्रिगिस,नुवेचे उमेदवार दत्ता बोरकर,कुडतरीचे उमेदवार अँथोनी बार्बोसा,बाणावलीचे उमेदवार दामोदर बांदोडकर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, बाबू आजगावकर यांना मडगावातील अल्पसंख्याक बांधवांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून दिगंबर कामत यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात लुडबूड करण्यापेक्षा मडगावात आपले लक्ष केंद्रित करावे. सासष्टीत पहिल्याच वेळा आठही मतदारसंघात कमळ फुलणार आहे. भाजप सरकारात बाबू आजगावकर यांना उपमुख्यमंत्रीपद आणि दामू नाईक यांना मंत्रीपद प्राप्त होणार आहे. पहिल्याच वेळी सासष्टीत भाजप आठ जागा लढवत आहे. यापूर्वी सासष्टी तालुक्यात 'मिशन सालसेत' राबवूनसुद्धा आम्हाला वेगळा अनुभव आला होता.पण यंदा सर्व सासष्टीवासीय आमच्याबरोबर आहेत याची आम्हाला खात्री आहे. सासष्टीत यावेळी विरोधकांची डाळ शिजणार नाही. कुंकळ्ळीतसुद्धा भाजपचे उमेदवार क्लाफासियो डायस यांचा विजय होणार आहे.अच्छे दिन कोणते होते असा प्रश्न विचारणार्‍या दिगंबर कामत यांनी 2012 पूर्वीच्या काँग्रेस राजवट आठवावी. कामत यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला होता.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले की, मडगाव आणि पेडणे मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येतील. मडगावकरांना बदल हवा आहे. सर्वजण एकत्र येत आहेत. कामत यांच्या कार्यकाळात शहराचा विकास झालेला नाही. त्यांच्या कामगिरीवर नाराज असलेले सर्व घटक आणि समाज एकत्र येत आहेत. दामू नाईक म्हणाले की, राज्य आणि केंद्रातील डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासदराबरोबर महसुलातसुद्धा वाढ झाली आहे. कोविडमुळे राज्याच्या महसुलाला कात्री लागली होती.विकासकामे ठप्प झाली होती.अशा काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला आर्थिक साहाय्य केले.राज्याला स्थिर सरकारची गरज असून त्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे.

खोट्या गोयंकारपणाला बळी पडू नका

सरकारवर टीका करणार्‍या विजय सरदेसाई यांनी अल्पसंख्याकांचा वापर केवळ मतांसाठी केला आहे.कब्रस्थानसाठी निवडलेल्या जागेचा झोन कसा बदलला यावर सरदेसाई यांनी स्पष्टीकरण द्यावे. कामत आणि सरदेसाई यांनी कचरा,सोनसोडोचा प्रकल्प, कब्रस्तान, पार्किंग प्रकल्प आणि बसस्थानक प्रकल्पावरून केवळ राजकारण करण्याचे काम केले आहे.त्यांचे खरे चेहरे आता लोकांसमोर आलेले आहेत. सरदेसाई यांच्या खोट्या गोयंकारपणाला जनतेने बळी पडू नये, असे अवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दिगंबर कामत पूर्णपणे अपयशी

पार्किंग प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प ,मार्केट बसस्थानक प्रकल्प या विषयांवर स्थानिक आमदार दिगंबर कामत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.कार्निव्हल,शिमगोत्सव यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम मडगावातून फातोर्ड्यात नेण्यात आलेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केली .

पाहा व्हिडीओ ; समलैंगिक असलेल्या अंजली – सुफीची 'अनोखी' प्रेम कहाणी | The Story of Lesbian Couple

https://youtu.be/gUWZqZyNLD0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news