

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या केवळ बढाया मारतात. मात्र, राज्यात या तिन्ही क्षेत्रांत काहीच विकास झाला नसून, येथील या सरकारच्या नाकर्तेपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक संघवी यांनी केली.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस नेत्या व मीडिया प्रभारी अलका लांबा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संघवी म्हणाले की, मोदींनी गोव्यातील भाजप सरकारचा कारभार पाहिला पाहिजे, मगत त्यांना पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानात खरोखरच भरभराट झाली की सरकारला अपयशी आले, ते त्यांना समजेल.
भाजप हा आमदार पळविणारा पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक सिंगवी. बाजूला अलका लांबा.
हेही वाचलतं का?